Pages

Sunday, August 12, 2012

ब्लॉगवर लेखन करताना एका दिवसाला एक लेख लिहिला, तर एका महिन्यात किमान तीस लेख लिहून होतात. तुमचे वाचक आर्काइव्हज वर क्लिक करून तुम्ही एका महिन्यात किती व कोणकोणते लेख लिहिलेत, हे पाहू शकतात. मात्र विचार करा, जर तुम्ही एका महिन्यात पंधरा लेख लिहिले असतील तर वाचक जेव्हा त्या महिन्याचे आर्काइव्हज पहायला जातात, तेव्हा त्यांना संपूर्ण पंधरा लेख एकामागोमाग ब्लॉगवर लोड होताना दिसतात. यामुळे संपूर्ण महिन्याचं पान लोड व्हायला बराच वेळ लागतो. जर तुम्ही लेखामधे चित्रं वापरली असतील तर ही प्रक्रिया आणखीनच लांबते.

हाच प्रकार तुम्ही दिलेल्या लेबल्सच्या बाबतीतही घडतो. एकच लेबल असलेलं पंधरा लेखांचं पान पूर्ण लोड होईपर्यंत वाचकाकडे सहनशक्ती असेल तर ठीक, नाहीतर ते ’पुन्हा केव्हातरी’ असं म्हणून तुमचा ब्लॉग सोडून जाऊ शकतात.

यासाठी आर्काइव्हज किंवा लेबलवर क्लिक केल्यास संबंधित पोस्टचे केवळ शिर्षक दिसल्यास पान तर लवकर लोड होतंच पण वाचकालाही हवा असलेला लेख निवडणं सुलभ जातं.

अशी सुविधा तुमच्या ब्लॉगवर करून हवी असेल, तर खालील गोष्टी कराव्यात:

१. सर्वात आधी तुमची मूळ टेम्पलेट डाऊनलोड करून घ्या. हे कसं करायचं ते मूळ टेम्पलेट कशी डाऊनलोड करावी या पोस्टमधे वाचता येईल.

२. आता Layout मधून Editi HTML मधे जा व Expand Widget Template ह्या पर्यायावर टिचकी द्या.

Expand Widget Template

३. खाली दिलेला कोड शोधा. यासाठी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर कीबोर्डवरील Ctrl व F ही बटणे एकाच वेळी दाबून उघडणारी सर्च विंडो वापरू शकता.

<b:include data='post' name='post'/>.

४. हा कोड मिळाला की त्या कोडच्या जागी खाली दिलेला कोड टाका.

<b:if cond='data:blog.homepageUrl
!= data:blog.url'>

<b:if cond='data:blog.pageType != "item"'>

<data:post.title/>

<b:else/>

<b:include data='post' name='post'/>

</b:if>

<b:else/>

<b:include data='post' name='post'/>

</b:if>

५. आता तुमची टेम्पलेट सेव्ह करा आणि आर्काइव्हज किंवा लेबल वर क्लिक करून बदल पडताळून पहा. अशाप्रकारे एका खाली एक, पोस्टसची केवळ शिर्षके दिसायला हवीत.

Posts too close

** जर पोस्टसची शिर्षके खूप जवळजवळ वाटत असल्यास, वर निळ्या रंगात दिलेल्या कोडच्या जागी

<data:post.title/>

असा कोड पेस्ट करावा, म्हणजे खाली चित्रात दर्शविल्याप्रमाणे दोन पोस्टसच्या शिर्षकांमधील अंतर वाढते.

Sufficient Space

**जर अक्षरे लहान हवी असतील तर याच कोड मधील h3 ह्या अक्षरांच्या जागी h4 अशी अक्षरे टाकून टेम्पलेट सेव्ह करा. आता पोस्टसची शिर्षके योग्य अंतरावर व लहान अक्षरांत दिसतील.

Reduced Font